Sunday, June 29, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी : राज्यपाल रमेश बैस

MH 13 News by MH 13 News
10 June 2024
in Blog
0
प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी : राज्यपाल रमेश बैस
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

राज्यपालांच्या हस्ते प्लास्टिक उद्योगातील निर्यात पुरस्कार प्रदान

मुंबई : विसाव्या शतकात शोध लागलेली प्लास्टिक बहुगुणी वस्तू असून आज दैनंदिन जीवनापासून अनेक क्षेत्रांत प्लास्टिकचा वापर अनिवार्य झाला आहे. भारतीय प्लास्टिक उद्योगाने जगातील अनेक बाजारपेठा काबीज केल्या असून या उद्योगाने संशोधन, नाविन्यता व उत्कृष्टतेच्या माध्यमातून ‘ब्रँड इंडिया’ निर्माण करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी  केले.

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे देण्यात येणारे ‘प्लास्टिक निर्यात उत्कृष्टता पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते नेसको, गोरेगाव मुंबई येथे प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सुप्रीम इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एम. पी. तापडिया, यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. कौन्सिलचे माजी अध्यक्ष अरविंद गोयंका यांना विशेष सन्मान देण्यात आला. एकूण 75 प्लास्टिक निर्यातदारांना पुरस्कार’ देण्यात आले.

मध्य पूर्वेतील युद्धजन्य स्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी होत असताना भारताची अर्थव्यवस्था तेजीने वाढत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  प्लास्टिक उद्योग 50 लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देत असल्याचे नमूद करून  प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने राज्यातील विविध विद्यापीठांशी सहकार्य स्थापित करावे तसेच विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील उद्योग आणि रोजगाराच्या संधींबद्दल अवगत करावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

जगातील अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारताचा संशोधन आणि नावीन्यतेवरील खर्च खूपच कमी आहे असे सांगून प्लास्टिक उद्योगाने  संशोधन आणि नवनिर्मितीवर अधिक भर द्यावा, असे राज्यपालांनी सांगितले.

प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी तसेच प्लास्टिकचा पुनर्वापर आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष हेमंत मिनोचा, उपाध्यक्ष विक्रम भादुरिया व कार्यकारी संचालक श्रीबाश दासमोहपात्रा, प्लास्टिक क्षेत्रातील उद्योजक, आंतरराष्ट्रीय खरीददार  व निर्यातदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

Related Posts

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे  भोसले
Blog

विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे..!जन्मेनजय राजे भोसले

22 June 2025
सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..
Blog

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..

28 April 2025
ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!
Blog

ब्लॅक मंडे | शेअर बाजार ‘धडाम’ कोसळला ; ट्रम्प च्या टेरिफ कार्डचा दणका.!

7 April 2025
जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील
Blog

जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील

21 March 2025
‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !
Blog

‘महाराष्ट्र भूषण’ शिल्पकार ‘राम सुतार’ !

21 March 2025
फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर
Blog

फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर

13 March 2025
Next Post
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.