Sunday, August 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती

नवी दिल्ली  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रधानमंत्री पदाची आज तिसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यासोबत महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, सुरेश खाडे, छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व नेत्यांनी मोदींच्या शपथविधीचे कौतुक केले आणि देशाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील सहा मान्यवरांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

या शपथविधी कार्यक्रमात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव , रक्षा खडसे, आणि मुरलीधर मोहोळ  केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील या शपथविधी सोहळ्यात उपराष्ट्रपती जयदीप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह देशातील विविध राज्यांचे प्रमुख, राजकीय नेते, उद्योगजगताचे मान्यवर आणि अनेक परराष्ट्र प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. श्री मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक सोहळ्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली असून पुढील वर्षांमध्ये देशाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातील.

या सोहळ्यात एकूण ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यामध्ये ३० केंद्रीय मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री यांचा समावेश आहे.

Previous Post

प्लास्टिक उद्योगाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी : राज्यपाल रमेश बैस

Next Post

राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांकडून घेतला आढावा

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांकडून घेतला आढावा

राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांकडून घेतला आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.