MH 13News Network
जिल्ह्यातील हृदयरुग्णांसाठी रुग्णालय नक्कीच उपयुक्त ठरेल – एम.राजकुमार, पोलीस आयुक्त
डॉ.प्रमोद पवार,डॉ.दीपक गायकवाड डॉ.राहुल कारीमुंगी,डॉ. सिद्धांत गांधी यांनी सोलापूर शहरांमध्ये हृदयरोगाचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यास आज मंगळवारी सायंकाळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील हृदय रुग्णांसाठी हे रुग्णालय नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी रुग्णालयातील विभागांना पोलीस आयुक्तांनी भेट देऊन माहिती घेतली. चार कार्डिओलॉजिस्ट एकत्र येऊन रुग्णालय उभे करणे ही एक दुर्मिळ बाब आहे. त्याचसोबत कौतुकास्पद आहे. असे ते भेटीदरम्यान म्हणाले. नुकतेच या हॉस्पिटलचे उद्घाटन वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.
यावेळी रुग्णालयातील डॉ.प्रमोद पवार यांनी सविस्तररित्या येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. 24 तास रुग्णालयामध्ये प्रशिक्षित डॉक्टरांची टीम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
मुंबई येथील अत्याधुनिक रुग्णालयामध्ये सुद्धा जी मशीन उपलब्ध नाही ती सोलापुरामध्ये उपलब्ध असल्याचे डॉ.पवार यांनी बोलताना सांगितले. डॉ. गायकवाड यांनी रुग्णालयातील विविध विभागातील सुरू असलेल्या उपचाराबाबत पोलीस आयुक्तांना माहिती दिली.
डॉ. राहुल कारीमुंगी यांनी लहान मुलांच्या हृदयातील छिद्रांसाठी दुर्बिणीद्वारे बिना टाक्याचे ऑपरेशन येथील हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल असे आवर्जून सांगितले. हृदय रुग्णांसाठी योग्य दरामध्ये येथे वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्तांनी एसीएस रुग्णालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.