Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बळीराजासाठी ‘ या ‘ गावांना 6 तास वीजपुरवठा ; प्रणिती शिंदे यांनी केला पाठपुरावा

MH13 News by MH13 News
2 years ago
in कृषी, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
33
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे. मात्र, नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तासच सुरू असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल प्रशासनाने घेतली असून आता दररोज 6 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

प्रणिती शिंदे, काँग्रेस उमेदवार

उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले. मात्र, पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ दोन तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे या मंगळवेढा दौऱ्यावर असताना नदीकाठचा वीजपुरवठाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती.

जिल्हाधिकाऱ्यांना लिहले होते पत्र-

भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र लिहून 8 तास वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या मागणीची दखल घेतली असून सहा तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठया प्रमाणात वाढली आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. या परिस्थितीत भीमा काठच्या पिकांना झळ बसत असताना, उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडल्याने नदीकाठचा वीजबंदचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.

सध्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झाली आहेच, पण त्याही पेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. आता वीजपुरठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तत्काळ दखल घेऊन त्याची सोडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी…

Next Post

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.