MH 13 NEWS NETWORK
सोलापूर (दि. ३) : सोलापुरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येने शहरातील राजकारणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक २ च्या उमेदवारासह तब्बल १५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सोलापुरात थेट खून होतो, ही अतिशय गंभीर बाब आहे. भाजपकडे उमेदवार नसल्यामुळे बिनविरोध निवडणुकांसाठी दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे, ही लाजिरवाणी परिस्थिती आहे,” असा आरोप त्यांनी केला.
भाजपला सर्वच प्रभागांत बिनविरोध निवडणुका हव्या असून त्यासाठी उमेदवारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “बंडखोर उमेदवारांवरही दबाव टाकला जात आहे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या पदाची किमान प्रतिष्ठा तरी राखली पाहिजे. एवढ्या खालच्या पातळीवर निवडणुका लढवल्या जात असतील तर लोकशाही कुठे टिकणार?”
प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रशासनावरही तीव्र टीका केली. सोलापुरातील निवडणूक अधिकारी अद्याप अंतिम उमेदवार यादी जाहीर करत नाहीत, दिलेल्या आकडेवारीत तफावत आढळते, तसेच निवडणूक केंद्रांच्या परिसरात कायम गोंधळाची स्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. “त्या दिवशी शंभर टक्के भाजपने खिडकीतून ए.बी. फॉर्म दिले,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
अर्ज माघारीसाठी उमेदवारांना फरपटत नेल्याचे आरोप करत प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “आता झालेल्या हत्येबाबत भाजपकडून हे कौटुंबिक वादाचे प्रकरण असल्याचे सांगितले जाईल. मात्र, सत्य जनतेसमोर येईलच.”
शेवटी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारले की, “जर प्रशासनातील अधिकारी महाविकास आघाडी किंवा इतर विरोधी पक्षांना साथ देणार नसतील, तर लोकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे?”
या आरोपांमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत हा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आ








