MH13 News Network
शेगाव( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूक शेगाव जि. बुलढाणा येथे रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी पार पडली.
राज्यभरातील 170 मतदारांपैकी 136 मतदारांनी मतदान केले. एक मत बाद झाले. डॉ. गजानन कोटेवार, वर्धा यांना 85 मते मिळाली तर गुलाबराव मगर यांना 41 मते मिळाली. कोकण मधील मंगेश मस्के यांना नऊ मते मिळाली असून उस्मानाबाद मधील वसंत सूर्यवंशी यांना शून्य मते मिळाली, ते स्वतःही मतदानास उपस्थित राहिले नाहीत.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.डॉ गोपाल हेलोंढे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडून निकाल घोषित केला. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक प्रक्रियेनंतर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
सोलापूर जिल्ह्यातून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार ,ग्रंथमित्र गुलाबराव पाटील, कार्यवाह साहेबराव शिंदे ,मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, विनोद गायकवाड, शैलेशिल्पा जाधव, अरुण जाधव ,संजय सरगर ,आकाश जगताप हे उपस्थित होते.यावेळी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.