mh 13 news network
![](https://mh13news.com/wp-content/uploads/2024/05/त्रिनिदाद-आणि-टोबॅगो-देशाचे-पंतप्रधान-डॉ.-किथ-रॉली-यांचे-स्वागत-2.jpg)
मुंबई : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे आज भारताच्या दौऱ्यावर मुंबईत आगमन झाले. पंतप्रधान डॉ. रॉली व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांचे ओबेरॉय हॉटेल येथे राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलींद हरदास यांनी स्वागत केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
![](https://mh13news.com/wp-content/uploads/2024/05/त्रिनीनाद-आणि-टोबॅगोच्या-पंतप्रधानांचे-मुंबईत-आगमन-1-750x375-1.jpg)
पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळात त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे परिवहन मंत्री रोहन सिनानन, क्रीडा व समुदाय विकास मंत्री शामफा कुडजो लेविस, भारतातील उच्चायुक्त डॉ. रॉजर गोपॉल आदींचा समावेश आहे.