MH 13 News Network
माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांची सुपुत्र रणजीत शिंदे हे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी,पदयात्रा ,आणि कॉर्नर सभेवर मोठा भर दिला आहे. माढ्यातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे रणजीत शिंदे यांनी सांगितले.
उपळाई बुद्रुक, जामगाव, वडाची वाडी,अंजनगाव, सुलतानपूर (राहुल नगर) महातपूर, जाधववाडी (मा ),जाधवाडी (मो ),उजनी (माढा ),मौजे भेंड, वेताळवाडी ,रणदिवेवाडी, मौजे करकंब इत्यादी गावात प्रभावी प्रचार यंत्रणा सोबत घेऊन रणजीत शिंदे यांनी होम टू होम प्रचार आणि कॉर्नर सभा घेतल्या आहेत.
ठिकठिकाणी फुलांची उधळण..
अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या गावभेटी दरम्यान ठिकठिकाणी फुलांची उधळण, ढोल ताशाच्या गजरात स्वागत, महिला भगिनींकडून औक्षण केले जात आहे.
ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या शिंदे हे जाणून घेत आहेत. त्याचसोबत याआधी केलेली विकासाची कामे मतदारांना सांगून भविष्यात नवीन योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले जात आहे.
विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकास कामावर बोलू..!
निवडणूक ही काही दिवसांसाठी असते. कोणावर खालच्या पातळीत बोलणे आमच्या संस्कारात बसत नाही. बबनदादांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. शेकडो कामे मतदार संघात झालेली आहेत. विकास कामांवर ग्रामस्थ समाधानी आहेत.
कारखाना, दूध संघ, इतर उद्योगातून हजारो युवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे.मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिर, सामुदायिक विवाह, मनरेगा योजना, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजनेतून अनुदान, मुख्यमंत्री सहायता निधी, ज्येष्ठांना काशीयात्रा अशा अनेक सामाजिक कामातून हजारो कुटुंबे शिंदे परिवारासोबत जोडलेली आहेत.
विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकास कामावर बोलण्यावर माझा भर असतो. माढ्यातील जनता सुज्ञ आहे. यंदा पुन्हा आमचा विजय होणार याचा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांनी दिली.