Wednesday, August 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मुंबई शहर जिल्ह्यातील सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त सर्व तक्रारीचे निवारण

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
मुंबई शहर जिल्ह्यातील सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त सर्व तक्रारीचे निवारण
0
SHARES
14
VIEWS
ShareShareShare

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

MH 13 NEWS NETWORK

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल (cVIGIL) हे ॲप सुरू केले आहे. तर नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे.  सी –व्हिजिल या ॲपच्या माध्यमातून मुंबई शहर जिल्ह्यांअंतर्गत असलेल्या लोकसभा मतदारसंघात १६ मार्च ते ५ मे पर्यंत १२३ तक्रारी प्राप्त झाल्या.या सर्व तक्रारीचे जिल्हा निवडणूक विभागाकडून निवारण करण्यात आले आहे. तसेच एनजीएसपी पोर्टलवर  नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल घेतली जात आहे.

नागरिकांना निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करता येते. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करण्यात येते. १६ मार्च ते ५ मेपर्यंत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ७२ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ५१ तक्रारी सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारीचे  निवारण करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल  हे नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात.https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर  १६ मार्च ते दि. ५ मे २०२४ या कालावधीत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ८९३ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ८४८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ८३१ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ८३७  तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित २८ तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे, वरील ॲप/पोर्टलवर केलेल्या तक्रारीबाबत काय कार्यवाही झाली याची माहिती तक्रारदारास त्याचे लॉगीनमध्यॆ पाहता येते अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून दिली आहे.

Previous Post

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Next Post

मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक काळात जप्त रकमेबाबत दाद मागण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक काळात जप्त रकमेबाबत दाद मागण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर

मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक काळात जप्त रकमेबाबत दाद मागण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.