MH 13News Network
लोकमंगल बँक व लोकमंगल पतसंस्था शाखा – सांगोला यांच्या संयुक्त विद्यमनाने आयोजित उद्योजक व ग्राहक स्नेहसंवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
लोकमंगल बँक व लोकमंगल पतसंस्था सांगोला शाखेच्या संयुक्त विद्यमनाने रामकृष्ण गार्डन व्हीला येथे उद्योजक व ग्राहक स्नेहसंवाद मेळावा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सोलापूर जिल्हा समन्वयक योगेश वाघ यांनी महामंडळाची सविस्तर माहिती ग्राहकांना दिली.
तसेच प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग कर्ज योजनेची सविस्तर माहिती सदर योजनेचे अधिकारी समाधान खूपसे यांनी दिली. प्रारंभी सांगोला शाखेच्या वतीने नवीन वाहन वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा चावी प्रदान कार्यक्रम मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी ग्राहकांनी आपले मनोगत व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगत बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांनी सांगोला व परिसरातील उद्योजकांनी विविध शासकीय महामंडळाचा (व्याज परतावा कर्ज योजनेंचा) लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवावा व प्रत्येक उद्योजकांनी आर्थिक सक्षम व्हावे याकरिता लोकमंगल बँक नेहमी आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी लोकमंगल पतसंस्थेचे चेअरमन गुरणा तेली,सरव्यवस्थापिका सौ अलका देवडकर, बँकेचे पालक संचालक विजय कुलकर्णी, पतसंस्थेचे तज्ञ संचालक ॲड. गजानन भाकरे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल बँकेचे व पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.