MH 13 News Network
अक्कलकोट : ‘वंचित’चे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी दिला गावभेट,पदयात्रा, रॅलीवर जोर ; प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट ( प्रतिनिधी )250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातीलवंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार संतोषकुमार खंडू इंगळे यांचा विधानसभा मतदारसंघात गावभेट दौरा, कॉर्नर बैठक आणि होम टू होम प्रचारावर भर दिला असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील हसापूर, कोन्हाळी, हालहळळी, चप्पळगांववाडी, दहिटनेवाडी, हालचिंचोळी, हंजगीजेऊर, हंद्राळ, करजगी, कलहिप्परगी, पानमंगरूळ, देविकवटा, कुडल, म्हैसलगी, खानापूर, तडवळ, मुंडेवाडी, कलकर्जाळ कंठेहळ्ळी, बोरीउमरगे, मिरजगी, मैदर्गी, संगोळगी, बणजगोळ, नीमगाव, हत्तीकणबस, चिकेहळ्ळी, भोसगा, मुगळीकडबगाव, अक्कलकोट स्टेशन जेऊरवाडी, कल्लाप्पावाडी, बासलेगाव, बबलाद, तोळनुर, वळसंग, बोरामणी, होटगी, कुंभारी आदी भागात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचा जोरदार प्रचार करण्यात आला.

विविध गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संतोषकुमार इंगळे यांनी अक्कलकोट तालुक्याच्या व मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी बेरोजगारी हटविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करा असे आवाहन मतदारांना केले.

या प्रचार दौऱ्यात जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे ,वंचित बहुजन युवक आघाडी तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे,सम्यक विद्यार्थी आंदोलनराज्य प्रवक्ता रविराज पोटे,वंचित बहुजन माथाडी जनरल कामगार युनियन तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे,गंगाराम वाघमारे, साहिल कांबळे, आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.