MH 13 NEWS NETWORK
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ या पुरस्कारासाठी निवड झालेले ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना उद्या तो प्रदान केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उद्या शुक्रवार १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी नोएडा, उत्तर प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.








