राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा. शरदचंद्र पवार यांचे सांगोला येथे आज शुक्रवारी दुपारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी शरद पवार ज्या वाहनात बसले त्याचे सारथ्य चेअरमन अभिजीत पाटील यांनी केल्यामुळे उपस्थित मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सोलापूरची ओळख होती .त्याचे सारथ्य अभिजीत पाटलांकडे गेले की काय अशी चर्चा आता राष्ट्रवादीत आणि अजित पवार गटामध्ये सुरू झाली आहे.
पक्षाचे नेते शरद पवार यांनी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आहे.तसेच आज सांगोला येथे गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव २०२४ चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी डाॅ. अनिकेत देशमुख.,बाबासाहेब देशमुख, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे सुद्धा उपस्थित होते.
Sharad Pawar