
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का
मुंबई – ‘कांटा लगा’ या गाजलेल्या म्युझिक व्हिडिओमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आणि ‘बिग बॉस १३’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे आकस्मिक निधन झाले आहे. २७ जून रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी शेफाली यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहत भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत.