..
आनंद विटकर व दत्ता पवारांसह लक्ष्मण पवार मित्रपरिवाराचा पक्षात प्रवेश..
सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर पूर्व विभागात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आपले संघटन विस्तारत असून नवीन सदस्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट होत असल्याचा दावा जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केला आहे.

साईबाबा चौक परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद विटकर, दत्ता पवार आणि लक्ष्मण पवार मित्रपरिवार यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.प्रवेश सोहळ्याला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहरप्रमुख सचिन चव्हाण, युवा नेते श्रीनिवास संगा, ज्येष्ठ नेते तुकाराम नाना मस्के, कामगार सेनेचे सायबण्णा तेगेळ्ळी, सचिन जवळकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले की, या प्रवेशामुळे पूर्व विभागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून येऊ घातलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत याचा ठोस परिणाम दिसणार आहे.

तळागाळातील जनसंपर्क आणि समाजकार्यात या नव्या ऊर्जेचा मोठा फायदा पक्षाला होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरप्रमुख सचिन चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी निर्णयांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच घराणेशाहीविरुद्ध युवकांचा लढा म्हणजेच शिवसेना शिंदे गटाची खरी ताकद असल्याचेही ते म्हणाले.
पूर्व विभागात युवक मोठ्या संख्येने शिवसेनेच्या बाजूने उभे राहत असल्याचे नमूद करत युवा नेते श्रीनिवास संगा म्हणाले, “मी स्वतः पूर्व भागात युवकांशी संवाद साधून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे. यंदाच्या महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील.”
युवकांचा वाढता ओढा, कार्यकर्त्यांचा जोश आणि सतत वाढणारा संघटन विस्तार पाहता यंदा महापालिकेत भगवा निश्चित फडकणार, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.







