MH 13News Network
शिवशरण पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत.पण त्यांचा दांडगा जनसंपर्क तसेच लोकांच्या अडचणी सोडविण्याचा सपाटा पाहता ते जनतेच्या हृदयातील आमदार आहेत असे गौरवोद्गार डॉ.शिवरत्न शेटे यांनी काढले.
माजी आमदार शिवशरण आण्णा बिराजदार पाटील यांचा आण्णा मित्र परिवार व शिवराज प्रतिष्ठान च्या वतीने वाढदिवसानिमित्त स्नेहमेळाव्यात नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ.शेटे बोलत होते.
या कार्यक्रमात सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन धर्मराज काडादी म्हणाले की शिवशरण पाटील यांचे कार्य म्हणजे धाडसी कार्य असते म्हणूनच त्यांना ढाण्या वाघ म्हणतात. प्रतिकुल परिस्थिती असताना ही कामे कशी करुन घ्यावीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवशरण आण्णा पाटील होय.
माजी आमदार दिलीप माने म्हणाले की शिवशरण आण्णा व मी वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात असलो तरी त्यांची व माझी नाळ जुळते. तीस वर्षांपासून आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत.आजही अनेक आजी माजी मंत्र्याकडे आदराने स्वागत केले जाते.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते म्हणाले की विरोधी पक्षात असले तरी मतदार सांगतीलच नव्हे तर इतर अनेक कामे त्यांनी करुन घेऊन एक आदर्श निर्माण केला.
दक्षिण सोलापूर माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे म्हणाले की,आण्णांनी सर्व पुण्याची कामे केली आहेत. अनेकांचे भाग्य घडविले आहे.त्यामुळे ते कोणत्याही संकटाचा नेटाने सामना करतात.
ॲड.कोथिंबीरे म्हणाले की शिवशरण आण्णा पाटील हे कोणतेही काम करताना जातपात व काळवेळ पहात नाहीत.त्यामुळे आजही लहान ते वृद्ध लोकामध्ये लोकप्रिय आहेत.
सत्काराला उत्तर देताना शिवशरण पाटील म्हणाले की जनता हीच माझी संपत्ती आहे.जनतेचे प्रेम हे माझी ऊर्जा आहे.मी शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी कटिबद्ध आहे असे म्हटले.
याप्रसंगी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, संजय मोरे,सुरेश नागुर आदींची भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरूषांत धुत्तरगावकर, राजु होशेट्टी,आप्पासाहेब बिराजदार,निवृत्त पोलिस अधिकारी महीबुब मुजावर, राजु भुसनुर (आळंद)आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास ए.जी.पाटील कॉलेज चे चेअरमन सिद्धेश्वर पाटील,सिद्धेश्वर राजमाने,सुजितअडडूणगी विजयकुमार रामपुरे, शिवराय बुक्कानुरे,मल्लिनाथ हुणजे,स्वामी समर्थ क्लासेस चे आप्पासाहेब केदार,सिद्राम खेडगीकर,मनोज नारायणकर, गुरुलिंग समाणे, डॉ.युवराज माने,राजु बिराजदार,हेमंत पाटील,मल्लिनाथ भुसेट्टी,गंगाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बगले सर यांनी केले.
कार्यक्रमासाठी ऍड.राजशेखर बिराजदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर पाटील, बालाजी सपाटे, लालसिंग चव्हाण, रतिकांत गोटाळे,अजिज जमादार, हिरेमठ सर, सचिन पाटील, शांतेश कलबुर्गी, शिवराज प्रतिष्ठान चे अजय माशाळे,किरण गोडसे,विजय माशाळे,दीपक दौलताबाद, गणेश कदम,समर्थ पाटील, राहुल कोकणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दिवसभर अनेक मान्यवरांनी शिवशरण पाटील यांना सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.