Wednesday, May 21, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘त्या’ हेरिटेज वास्तु परिसरात होणार AC शौचालय ; व्यापारी व नेत्याचा विरोध.. असे आहे कारण..!

MH13 News by MH13 News
3 June 2024
in राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
154
VIEWS
ShareShareShare

हेरिटेज दर्जाच्या वास्तु परिसरात  उत्खनन करून बेकायदेशीर शौचालय उभारणीला नवी पेठ परिसरातील व्यापाऱ्यांचा विरोध

पालिका आयुक्तांनी ऐतिहासिक हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूच्या सौंदर्याची जतन करावी अन्यथा जनआंदोलन :-मा. सभागृह नेते सुरेश पाटील

नवी पेठ परिसरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत वातानुकूलित सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे. सध्या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधकाम बेकायदेशीर सुरू झाले आहे. दरम्यान, सोमवारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी येथील स्थानिक व्यापाऱ्यांसमवेत या परिसरात भेट देऊन या बेकायदेशीर सुरू असलेल्या बांधकामाची  पाहणी केली.

या बांधकामास येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून मूळ इमारतीचे सौंदर्य यामुळे जाणार आहे. या इमारतीच्या सौंदर्याला कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावे. ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे या बेकायदेशीर शौचालया मुळे या वास्तूची प्रतिमा मलीन होईल याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी शहरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून भारतीय पुरातन विभागाची परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचं आहे.

असे होताना दिसत नाही परंतु या वास्तूला मोठी ऐतिहासिक वारसा आहे. मार्शल लॉ च्या काळात या वास्तूवर शेठ माणिकचंद शहा या  नगराध्यक्षांनी तिरंगा ध्वज फडकवला होता त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना अटक केली होती अशी ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात बेकायदेशीर बांधकाम करणे हे चुकीचे होणार आहे संबंधित बांधकाम त्वरित थांबवा अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी यावेळी दिला.

पालिका आयुक्तांनी सोलापूर शहरातील दुरावस्थेत पडलेल्या शौचालयाची पाहणी करावी त्या शौचालयाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात मोठी दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ही समस्या प्रथमता पालिका आयुक्तांनी दूर करावे. नवी पेठ परिसरात अनेक शॉपिंग सेंटर आहेत या परिसरात असणाऱ्या शॉपिंग सेंटर मधील सार्वजनिक शौचालय सर्व सोयी नियुक्त करा परंतु असे होताना दिसत नाही. नवी पेठ परिसरातील सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात हेरिटेजची वास्तू परिसरात असे सार्वजनिक शौचालय बांधकाम योग्य होणार नाही. यामुळे या वास्तूची सौंदर्य निघून जाईल याची खबरदारी घ्यावी. हेरिटेज दर्जा असणाऱ्या या वास्तूला मोठे ऐतिहासिक वारसा आहे हे वारसा जतन करावे. नुकतेच  सोलापूर महानगरपालिकेतील इंद्रभवन या वास्तूची नव्याने नूतनीकरण करण्यात आले सदरची वास्तू पाहण्यासाठी अनेक पर्यटक व ऐतिहासिक प्रेमी भेट देत असतात याच धर्तीवर नवी पेठ परिसरातील मनपा शिक्षण मंडळाच्या वास्तूची पालिका आयुक्तांनी नूतनीकरण करून या वास्तूची ऐतिहासिक परंपरा जपावी अशी मागणी येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी यावेळी केली.

सोलापूर शहरातील अनेक असे हेरिटेज वास्तू आहेत याची माहिती पालिका आयुक्तांना आहे का याचा विसर त्यांना पडला आहे का असा सवाल देखील उपस्थित होत आहे ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वस्तूंची जतन करणे हे काळाची गरज आहे असेही यावेळी सुरेश पाटील म्हणाले.

भारतीय पुरातन विभागाच्या परवानग्या आपण कायदेशीर घेतल्या आहेत का कुठलेही बांधकाम, पाडकाम आणि खोदकाम करत असताना आवश्यक त्या कागदपत्र परवाना आहेत का असे देखील ते म्हणाले. पालिका आयुक्तांनी या परिसरात सुरू असलेले बेकायदेशीर सौचालय त्वरित बंद करावी अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा देखील यावेळी सुरेश पाटलांनी दिला. विजय भोईटे, राजू पवार, मनोहर दासरी, अविनाश दासरी, विठ्ठल पवार, विजय गोरटे, सचिन पवार, इस्ताक शेख इरालाल साखराने यांच्यासह नवी पेठ परिसरातील व्यापारी यावेळी उपस्थित होते. त्वरित सदरचा शौचालयाचे बांधकाम पालिका आयुक्तांनी थांबवावे अशी प्रतिक्रिया देखील यावेळी उपस्थित व्यापाऱ्याने दिली.

Tags: solapur
Previous Post

‘उत्तर’मध्ये भाजपाचा स्नेहमेळावा उत्साहात ;आमदारांच्या उपस्थितीत संगीतमय जल्लोष

Next Post

‘पाटील’ हे जनतेच्या हृदयातील आमदार- डॉ.शिवरत्न शेटे

Related Posts

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा काँग्रेसला रामराम..! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार अक्कलकोटमध्ये..!
महाराष्ट्र

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा काँग्रेसला रामराम..! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार अक्कलकोटमध्ये..!

21 May 2025
दिवसा घरफोडी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला शिक्षा; ‘त्या’ सोनारालाही शिक्षा..
गुन्हेगारी जगात

दिवसा घरफोडी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला शिक्षा; ‘त्या’ सोनारालाही शिक्षा..

20 May 2025
ज्याचा शेवट चांगला त्याचं सारं चांगलं..! भुजबळांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ..!
महाराष्ट्र

ज्याचा शेवट चांगला त्याचं सारं चांगलं..! भुजबळांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ..!

20 May 2025
सोलापुरात भीषण आग; MIDCतील कारखान्यात ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू..
व्यापार

सोलापुरात भीषण आग; MIDCतील कारखान्यात ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू..

18 May 2025
इतिहास साजरा होणार अधिक नियोजनबद्ध पद्धतीने – शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी
धार्मिक

इतिहास साजरा होणार अधिक नियोजनबद्ध पद्धतीने – शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी

17 May 2025
९३५ कोटींचा निधी वेळेत खर्च करा – सर्व यंत्रणांना प्रशासनाचा आदेश
महाराष्ट्र

९३५ कोटींचा निधी वेळेत खर्च करा – सर्व यंत्रणांना प्रशासनाचा आदेश

17 May 2025
Next Post

'पाटील' हे जनतेच्या हृदयातील आमदार- डॉ.शिवरत्न शेटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.