सोलापूर – युनिक टाऊन विडी घरकुल परिसरातील बी.ई. इंजिनिअर श्रावणी नागेश सरगम हिने सलग नऊ वर्षांपासून मातीच्या गणपतीची स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण केला आहे.

अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन घरच्या घरीच करण्याची परंपरा तिने जपली आहे.पद्मशाली समाजाचे सामाजिक कार्यकर्ते नागेश सरगम यांची कन्या असलेल्या श्रावणीने शिक्षणाबरोबरच हरित संदेश देण्याचे काम केले आहे.

तिच्या या उपक्रमाचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, तरुणांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.
“देवही प्रसन्न आणि पर्यावरणही सुरक्षित – हाच खरा सण साजरा करण्याचा मार्ग आहे,” असा संदेश श्रावणीने आपल्या उपक्रमातून दिला आहे.