MH13 News Network
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ
सोलापूर : प्रतिनिधीश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रात दररोज काढण्यात येणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ झाला.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक परिसर, भवानी पेठ, अवंती नगर, दमाणी नगर, सुनील नगर, अक्कलकोट रस्ता, लष्कर, नीलम नगर अशा विविध ठिकाणी श्री दुर्गामाता दौड दररोज सकाळी ६.३० वाजता काढण्यात येत आहे.
लष्कर परिसरातील श्री दुर्गामाता दौडीप्रसंगी प्रारंभी भगव्या ध्वजाचे पूजन जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील विविध भागात नियोजित मार्गावरून ही दौड काढण्यात येत आहे.
देव देश धर्माच्या रक्षणासाठी आशीर्वाद मागण्याकरिता आई जगदंबेच्या पायाशी हिंदू समाजाने एकत्रितपणे जाण्याचा उपक्रम म्हणजे श्री दुर्गामाता दौड आहे असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सांगण्यात आले.
सर्व शिवभक्तांनी, हिंदू बांधवांनी या दुर्गामाता दौडीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे.