MH 13 NEWS NETWORK
सोलापूर महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व जागतिक लिगायत महासभा सोलापूर , राष्ट्रीय लिगायत महामंच भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी रविवारी सकाळी ११ ते ४ मातोश्री लि. सौ. सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतीक भवन,हत्तुरे वस्ती, विमानतळ समोर, मजरेवाडी सोलापूर येथे राज्यस्तरीय लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे यांनी पत्रकार परिषद माहिती दिली.
लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन प.पु. बसवलिंग महास्वामीजी शिवयोगी मठ,सोलापूर, प. पु. स्वामीनाथ महास्वामीजी किरीटीश्वर मठ सोलापूर, प्रमुख प्रा. शिवानंद गोगाव सर- जागतिक लिगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष सोलापूर , महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे व माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक रेवणसिद्ध जवळेकर, शंकरराव लिंगे-अध्यक्ष अखिल भारतीय माळी संघ, पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ , नामदेव फुलारी, रेवणसिध्द बिजरगी, सचिन शिवशक्ती, तुकाराम माळी, सिद्ध मल्लिकार्जुन संस्थेचे अध्यक्ष गणेश चिंचोळी,विरेंद्र हिंगमिरे, प्रा राजाराम पाटील ,सिद्धाराम कटारे ,अमोल म्हमाणे आदी उपस्थित राहणार आहेत.
महात्मा बसवेश्वर वधु-वर सुचक केंद्र कुपवाड सांगली या संस्थेच्या वतीने सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, गुडापूर, या ठिकाणी मेळावा घेण्यात आला असून व पुढील मेळावे बेळगाव, विजापूर, अथणी या ठिकाणी नियोजित असल्याने याचा फायदा सोलापूर मेळाव्यातील वधुवरांना होणार आहे. सामाजिक बांधलिकीतून उपक्रम घेवून सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये मेळावा आयोजित करण्यात येत असल्याने यांचा फायदा सोल्हापूर मेळाव्या मध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त बांधवाना होतो. सोलापूर या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यामध्ये नोंद करुन सहभागी होणाऱ्या वधुवरांना संस्थेच्या वतीने 2024मध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेले मेळाव्याचे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे व सांगली सोल्हापूर पुणे 2024 मध्ये झालेल्या मेळाव्याचे व सोलापूर येथे होणान्या मेळाव्याचे एकत्र pdf पुस्तक प्रकाशित करून वधुवरांना पाठविण्यात येणार आहे. तरी यांची नोंद घेऊन जास्तीत जास्त समाज बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे व अखिल भारतीय माळी संघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केले आहे.