MH 13 news network
संभाजीराव शिंदे विद्यामंदिरमध्ये माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सोलापूर /प्रतिनिधी
माजी महापौर स्व. महेश कोठे यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त गुणवंतांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुशील रसिक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अंजली मरोड या बोलत होत्या. यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे, दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता , स्व . विष्णूपंत (तात्या )कोठे,स्व.महेश (अण्णा) कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संभाजीराव शिंदे विद्यामंदिर जुनी मिल कंपाऊंड सोलापूर यांचे वतीने स्वर्गीय महेश (अण्णा) कोठे यांच्या 61 व्या जयंतीनिमित्त सुशील रसिक सभागृह सोलापूर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी संजीवनी भोजने व सरोजिनी भोजने या भगिनींचा सन्मान करण्यात आला.

तसेच संभाजीराव शिंदे प्रशाला इंचगाव शाखेतील विद्यार्थी राजदीप पवार तसेच राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मुरारजी पेठ येथील विद्यार्थी गंगाधर दोरकर व पृथ्वीराज ज्योतराव या विद्यार्थ्यांचा सत्कार आज 1एप्रिल रोजी अंजली मरोड, दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ये तसेच संभाजीराव शिंदे विद्यामंदिरचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश कोठे, संस्थेच्या संचालिका डॉ. राधिका चिलका, महापालिकेचे माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, महापालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती वासुदेव इपलपल्ली शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या वीणा कणबसकर, संस्थेचे प्राचार्य सचिन ढोपरे,मुख्याध्यापिका सौ राजश्री नारायणकर,माजी प्राचार्य हजारे, काटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी यशाची गुरुकिल्ली सांगितली. तसेच सत्कारमूर्ती सरोजिनी भोजने यांनी जिद्द व चिकाटी असल्यास परिश्रमाने यश साध्य करता येते असे आपल्या मनोगतामधून सांगितले, तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले तसेच दैनिक सुराज्यचे संपादक श्री राकेश टोळ्ये यांनी कबीरांचे दोहे, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राचे आपल्या भाषणात उदाहरणे देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
या कार्यक्रमास आमदार व संस्थेचे उपाध्यक्ष देवेंद्र कोठे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी पालक कोठे परिवाराचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.