विमानतळावर सोलापूर बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार..!
“सोलापूरला नक्की भेट देईन” — सरन्यायाधीश भूषण गवई..
सोलापूर / प्रतिनिधी :
देशाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई हे काही वेळासाठी सोलापूर विमानतळावर आले असता त्यांचे सोलापूर बार असोसिएशनतर्फे तसेच न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

या वेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अॅड. मिलिंद थोबडे, जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. मनोज शर्मा, सत्र न्यायाधीश मा. योगेश राणे, सिव्हिल जज (सीनियर डिव्हिजन) ओमप्रकाश पाटील, न्यायालयीन प्रबंधक मुकुंद ढोबळे, राजशिष्टाचार अधिकारी राजे पांढरे, अजित पगड्याल तसेच इतर अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या धावत्या भेटीदरम्यान पोलीस आयुक्त एम. राजकुमार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
अवघ्या काही मिनिटांच्या या भेटीत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी थोडक्यात संवाद साधला व केलेल्या स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बार पदाधिकाऱ्यांनी सरन्यायाधीशांना सोलापूरला अधिकृत भेट देण्याचे निमंत्रण दिले. त्यावर “भविष्यात नक्कीच सोलापूरला भेट देऊ,” अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
देशातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असलेल्या भूषण गवई यांच्या या अल्प भेटीमुळे सोलापूरच्या न्यायक्षेत्रासाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला.
Ritesh ThobdeAdv Babasaheb JadhavSolapur City Police#Solapur #ChiefJusticeBhushanGavai #SupremeCourt #SolapurBarAssociation #LegalNews #Judiciary #SolapurAirport #MaharashtraNews #HistoricVisit








