MH 13 news network
सोलापुरातील एसटी बस स्थानकातील एक शिवशाही बस काल सोमवारी मध्यरात्री जळाली का जळाली.? याबाबत पोलीस तपास करत आहेत. या ठिकाणी बसचा फक्त सांगाडा उरला आहे. संपूर्ण बस ही जळालेल्या अवस्थेत दिसून येतेय.
शिवशाही एम एच 06 बी डब्ल्यू झीरो 589 या क्रमांकाची बस काल सोमवारी मध्यरात्री जळाली असून कोणी पेटवली की पेटली याबाबत पोलीस तपास करत आहेत.
बस आगी मध्ये पूर्ण जाळून खाक झाली आहे. काही अज्ञातांकडून बस पेटवण्यात आली की शॉर्टसर्किट वगैरे अशा काही प्रकारामुळे हानी झाली याबाबत कारण अस्पष्ट आहे.
घटनास्थळी एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी हजर झाले असून पुढील तपास सुरू आहे.काल सोलापुरातील बस गाड्यांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती. तर, मध्यरात्री शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसडेपो मध्ये उभारलेल्या अवस्थेत असलेली शिवशाही बस आगीत बेचराख झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असल्याचे समजते.