MH 13News Network
सद्यस्थितीत महापालिकेत प्रशासन राज असल्यामुळे नगरसेवक मंडळी लोकप्रतिनिधी क्वचितच काही कामानिमित्त इंद्र भवन मध्ये येतात. अशावेळी एखादे काम झाले नाही की..! लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे अधिकारी वर्ग सोलापूरच्या भाषेत निवांत असतो..! वाचा नेमकं काय आहे कारण..
महापालिकेतील माजी नगरसेवक अनंत जाधव हे एका कामानिमित्त जन्म मृत्यू कार्यालयात गेले होते. साधारण दुपारी अडीच वाजल्यापासून या कार्यालयातील कार्यालयीन प्रमुख डॉ. वैशाली शिरशेट्टी या जेवायला गेल्या आहेत असा निरोप जाधव यांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिला. सव्वाचार वाजून गेल्या तरी डॉ.शिरशेट्टी आल्या नसल्यामुळे नेता आक्रमक झाले. लोकप्रतिनिधींना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय.? हा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
अनंत जाधव यांनी तात्काळ महापालिका आयुक्त शितल तेली उगले आणि उपायुक्त यांना याबाबतची तक्रार केली. तसेच नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अशा डॉक्टरवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, याबाबतची तक्रार त्या ऑफिसमध्ये असणाऱ्या हालचाल रजिस्टर मध्ये नोंद केली. याची गंभीर दखल घेण्याची मागणी जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.
डॉक्टरांचे स्वतःचे प्रायव्हेट हॉस्पिटल..!
आता अशी माहिती समजली आहे की या डॉक्टर शिरशेट्टी यांचं स्वतःचं जुना पुना नाका परिसरात निरक्षणा मेमोरियल हॉस्पिटल नावाने रुग्णालय असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे या डॉक्टर मॅडम स्वतःच हॉस्पिटल सांभाळून महापालिकेत वेळ द्यायला जमत नसेल तर आयुक्त, आरोग्य अधिकारी यांनी याची गंभीर दखल घ्यावी.
अनंत (नेता) जाधव, माजी नगरसेवक
दाखले देण्याचे काम याआधी..!
यांच्या संदर्भात अनेक तक्रारी याआधीही आलेल्या आहेत ,परंतु कोणतीच कारवाई होत नाही .जन्ममृत्यू दाखल्याचं इतकं हळू प्रमाणात दाखले देण्याचे काम याआधी कधीच झालेलं नाहीये. नागरिकांची गैरसोय होते परंतु कुणीच कारवाई करायला तयार नाहीये. जाधव हे महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडत आहेत. ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे व नागरिकांची सोय झाली पाहिजे.
राज सलगर,सामाजिक कार्यकर्ता