MH 13 News Network
निसर्गवारी बहुउद्देशीय संस्था यांचा पर्यावरण विषयक अनोख्या उपक्रमातून ३६० झाडांची लागवड
श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
गोरखचिंच, कुडा, भेहडा, हिरडा, अर्जुन, साल, राळ, धूप, कापूर बावची, यासारख्या यासारख्या वेगवेगळ्या जंगली, औषधी आणि दुर्मिळ अशा 360 वनस्पतींचे वृक्षारोपण निसर्गवारी बहुउद्देशीय संस्था पाकणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर फाउंडेशन व निसर्ग वारी कृषी पर्यटन केंद्र यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. सुवर्णा चवरे यांनी दिली.
मौजे पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथे असलेल्या एक एकर क्षेत्रामध्ये या वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. यावेळेस सिद्धेश्वर फाउंडेशनचे अनिल सर्जे, सुनील सर्जे, शहा, साळुंखे, श्री .मेश्राम, वेणू भोजने, सुप्रिया महिंद्रकर, पुष्पा व भारत काकडा, डॉ.शिल्पा व प्रशांत लांडे, डॉ सारिका व प्रमोद इंगळे, राम शिंदे, सुजाता व प्रसाद काटकर, इत्यादी 45 वृक्ष प्रेमींनी वनस्पती लागवडीमध्ये सहकार्य केले.
सोलापुरातील विद्यार्थ्यांना, अभ्यासाकांना तसेच वनस्पती शास्त्रज्ञाना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती व्हावी आणि पर्यावरण संतुलन होण्यास मदत व्हावी, याकरता हा उपक्रम राबवल्याचे कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका डॉक्टर सुवर्णा चवरे यांनी सांगितले. विदेशी वनस्पतींची लागवड करण्यापेक्षा स्थानिक व देशी वनस्पती लागवडीचे अनेक फायदे असल्याने, शेतकरी बंधू तसेच सामाजिक संस्थांनी देशी आणि स्थानिक वनस्पतींना प्राधान्य द्यावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर व निसर्ग वारी कृषी पर्यटन केंद्र यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही झाडे जगवण्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी भेट देऊन, काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. वृक्ष लागवड करण्यासंदर्भात श्री अनिल सर्जे यांनी लिहिलेली प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी घेतली. श्री .मेश्राम, वेणू भोजने, सुप्रिया महिंद्रकर, पुष्पा व भारत काकडा, डॉ.शिल्पा व प्रशांत लांडे, डॉ सारिका व प्रमोद इंगळे, राम शिंदे, सुजाता व प्रसाद काटकर, इत्यादी 45 वृक्ष प्रेमींनी वनस्पती लागवडीमध्ये सहकार्य केले.
सोलापुरातील विद्यार्थ्यांना, अभ्यासाकांना तसेच वनस्पती शास्त्रज्ञाना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती व्हावी आणि पर्यावरण संतुलन होण्यास मदत व्हावी, याकरता हा उपक्रम राबवल्याचे कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका डॉ.सुवर्णा चवरे यांनी सांगितले.
विदेशी वनस्पतींची लागवड करण्यापेक्षा स्थानिक व देशी वनस्पती लागवडीचे अनेक फायदे असल्याने, शेतकरी बंधू तसेच सामाजिक संस्थांनी देशी आणि स्थानिक वनस्पतींना प्राधान्य द्यावे असेही आवाहन त्यांनी केले आहे. श्री सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूर व निसर्ग वारी कृषी पर्यटन केंद्र यांच्या पदाधिकाऱ्यांनी ही झाडे जगवण्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी भेट देऊन, काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. वृक्ष लागवड करण्यासंदर्भात श्री अनिल सर्जे यांनी लिहिलेली प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी घेतली.