Friday, December 5, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur : लाडक्या बहिणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी..! जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर..! वाचा

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
30
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान….
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पूर्वतयारीचा  जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून आढावा

सोलापूर,दि. 02 –

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रत्येक शासकीय यंत्रणेने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.


  नियोजन भवन येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रांताधिकारी-1 सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, अधिक्षक अभियंता संजय माळी, सोलापूर मनपा उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख दादासाहेब घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन द्वारे बैठकीत सहभागी झालेले होते.
  यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत बांधकाम विभागाकडून कार्यक्रम स्थळावर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेतली. 

तसेच पार्कींग, वीज पाणी, साफसफाई याबाबतची महापालिकेकडून माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या.  सर्व विभागांनी सोपविलेली कामे वेळेत पूर्ण करावीत.  कार्यक्रम स्थळी शासकीय विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबध्द काम करावे. पोलीस विभागाने कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे. वाहतुकीस कोठेही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था ठेवावी. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे यासाठी आवश्यक असलेल्या 400 बसेसची पूर्तता करावी. पुरवठा विभागाने लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्याबरोबरच पाणी कुठेही कमी पडणार नाही याची ही दक्षता घ्यावी, असे त्यांनी सुचित केले.

या कार्यक्रमासाठी 30 ते 40 हजार महिला लाभार्थी येण्याचे नियोजन करण्यात येत असून त्या अनुषंगाने कार्यक्रमच्या ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Tags: chief minister of MaharashtraCMOMaharashtra  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे  Devendra Fadnavis Ajit Pawar  Chandrakant PatilCollector office solapurkumar ashirwad
Previous Post

यज्ञ हे ईश्वराचे रूप ; नराचा नारायण होण्याची प्रक्रिया म्हणजे भक्ती

Next Post

Solapur : लाडक्या बहिणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी..! जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर..! वाचा

Related Posts

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..
आरोग्य

Zp | गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू..

5 December 2025
पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
गुन्हेगारी जगात

Pandharpur |दुष्कर्मप्रकरणी नृत्य शिक्षकास कोल्हापूर उच्च न्यायालयाचा दिलासा..!

4 December 2025
सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
Next Post

सोलापुरात डेंग्यूचा प्रादुर्भाव ; दक्षिणेतील 'नेता' आला धावून..! वाचा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.