कल्याणी देवर हत्येप्रकरणी न्यायालयाचा निकाल;
ॲड. संजीव सदाफुले यांनी केला असा युक्तिवाद..
सोलापूर (दि. १६ ऑक्टोबर २०२२)शिवशक्ती चौक, MIDC सोलापूर येथे घडलेल्या कल्याणी देवर हत्येप्रकरणी आज महत्त्वाचा निकाल लागला. न्यायालयाने या प्रकरणातील तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले असून, बचाव पक्षाच्या ॲड. संजीव सदाफुले यांनी सादर केलेल्या युक्तिवादाला न्यायालयाने मान्यता दिली.
घटनेचा पार्श्वभूमी..
१६ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजता, शिवशक्ती चौक परिसरात कल्याणी देवर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिस तपासानुसार, कामाची देवर, शिवा देवर आणि महेश देवर या तिघांनी अनैतिक संबंधाच्या संशयावरून धारदार शस्त्राने कल्याणी देवर यांचा खून केल्याचा आरोप होता.या प्रकरणी मयताचा भाऊ राजेश कन्नन देवर यांनी MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

न्यायालयीन कार्यवाहीया खटल्यात सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तथापि, साक्षींमध्ये आलेल्या विसंगती आणि पुराव्यांतील त्रुटी यावर आधारित ॲड. संजीव सदाफुले यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला.
न्यायालयाने बचाव पक्षाच्या मांडणीवर विश्वास ठेवत तीनही आरोपींना निर्दोष मुक्त केले.सरकार पक्षाच्या वतीने ॲड. आनंद कुर्नुकर यांनी काम पाहिले, तर बचाव पक्षाची बाजू ॲड. संजीव सदाफुले, ॲड. सिद्धांत सदाफुले, ॲड. प्राची सदाफुले, ॲड. राज सुरवसे, ॲड. गिरीष सुरवसे, ॲड. निलेश वाघमारे आणि ॲड. प्राजक्ता काळे यांनी प्रभावीपणे मांडली.
#SolapurNews #CourtVerdict #KalyaniDevarCase #AdvSanjivSadafule #JusticePrevails #LegalUpdate #MIDCSolapur #CrimeAndLaw #MaharashtraNews








