उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
सोलापूर –महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था, माजी नगरसेवक किसनभाऊ जाधव आणि नागेश (अण्णा) गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा २१ ते २५ जुलै २०२५ दरम्यान रामवाडी, सोलापूर येथील नवयुग जांबवीर तरुण मंडळ क्रीडांगणावर (शासकीय गोदाम व गंगामाई हॉस्पिटलजवळ) पार पडणार आहे.स्पर्धेचे उद्घाटन २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेपूर्वी सकाळी ९ वाजल्यापासून वजन आणि कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया फक्त २१ जुलै रोजीच पार पडेल. त्या दिवशी अनुपस्थित राहणाऱ्या संघांचा स्पर्धेत समावेश केला जाणार नाही, अशी माहिती आयोजकांनी दिली.स्पर्धेसाठी संघ संलग्नता फी ५०० रुपये व प्रवेश फी २६० रुपये इतकी आहे.
वजन मर्यादा पुढीलप्रमाणे:▪️ पुरुष गट – ८५ किलो
▪️ महिला गट – ७५ किलो
▪️ किशोर व किशोरी गट – ५५ किलो (जन्मतारीख ०१/०१/२०१० नंतरची असावी)
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा –
📞 संतोष जाधव – ९८५०४३०३४३
📞 मदन गायकवाड – ७९७२००७९८६
📞 प्रकाश जाधव – ८८०५२४२४३३
📞 चेतन गायकवाड – ७७५८०७०४५०
सोलापूर जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा एक महत्त्वाची संधी ठरणार असून, नागरिकांनी व खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.