Saturday, March 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे “हात” बळकट करा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे “हात” बळकट करा
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

चेतन नरोटे यांच्या प्रचार सभेत
काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल यांचे आवाहन

हिंदू – मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचा हैदराबादवाल्यांचा अजेंडा

सोलापूर : हिंदू – मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचा हैदराबादवाल्यांचा अजेंडा असल्याचा आरोप करत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी तसेच महाराष्ट्रात पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करा. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल (हैदराबाद) यांनी सोलापुरात केले.
विधानसभा निवडणुकीतील सोलापूर शहर मध्य मतदार संघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सुत मिल जवळील समाधान नगर आणि बेगम पेठ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, कोमोरो सय्यद, मोहसीन पिरजादे, धोंडप्पा तोरणगी, एजाज बागवान आदींसह मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी एमआयएम पक्षाचे नाव न घेता आपल्या भाषणात जोरदार टीका केली. हिंदू – मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा अजेंडा घेऊन हैदराबादहून लोक येतात. त्या लोकांचा उद्देश निवडणूक जिंकणे हा नाही. सोलापुरात त्यांनी चारदा निवडणूक लढवली. मात्र प्रत्येक वेळा निवडणुकीत त्यांचा मतांचा आलेख खाली येत आहे. भाजपला रोखण्यासाठी सोलापूर शहर मध्य आले असल्याचे ते सांगतात मात्र तसेच वास्तवात नाही. वास्तविक पाहता हैदराबाद येथील एमआयएमचे मुख्य कार्यालय परिसरातील दारुसलाम विधानसभा मतदारसंघाचे संघाचा आमदार भाजपाचा आहे. त्यांना भाजपच्या उमेदवाराला तिथे ते रोखता आले नाही. इथे सोलापूर शहर मध्य मधून भाजपाला पराभूत करण्यासाठी लढत असल्याचा कांगावा करत आहेत. भाजपाचे हे एजंट काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा सुजाण मतदारांनी महाराष्ट्रात पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे हात बळकट करावे. दिल्लीत पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी सोलापुरात शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे धडाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांना विजयी करावे, असे आवाहन यावेळी
निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी केले.
तुम्ही – हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये कितीही भांडणे लावा. आम्ही मात्र मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना विजयी करण्यासाठी खंबीर साथ देणार असल्याचे जोरदार उत्तर संबंधितांना या निवडणुकीत द्यावे, असे आवाहन निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी यावेळी केले.
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

— चौकट —

काँग्रेसचे चेतन नरोटे हे हिंदू – मुस्लिम दोघांनाही आपले वाटणारे उमेदवार

  बिलाल पुढे म्हणाले, मी शहर मध्य मतदारसंघात संघातील हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधला तेव्हा सर्वांनी मला सांगितले की, चेतन नरोटे हे जेवढे हिंदूंचे आहेत तितकेच मुस्लिम समाजाला जवळचे आहेत. हे ऐकून मला समाधान वाटले. त्यामुळे

काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी केले.

Previous Post

चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरणार ; फुलारे पती-पत्नीची ग्वाही

Next Post

हद्दवाढ भागातील विकासासाठी प्रयत्न करणार – चेतन नरोटे, मध्य उमेदवार

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
हद्दवाढ भागातील विकासासाठी प्रयत्न करणार – चेतन नरोटे, मध्य उमेदवार

हद्दवाढ भागातील विकासासाठी प्रयत्न करणार - चेतन नरोटे, मध्य उमेदवार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.