अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल नऊ महिन्यांपासून अटकेत असलेल्या रामसिंग धनीवाले व संतोष धनीवाले या पिता-पुत्रांना शेवटी न्याय मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने त्यांना जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकरणाची पार्श्वभूमी..
अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीत धनीवाले पिता-पुत्रांवर दमदाटीचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना सुसाईड नोट (चिठ्ठी) जप्त केली होती आणि आरोपींना अटक केली होती. सोलापूर सेशन्स कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
जामीन मंजूर करण्यासाठी असा केला युक्तिवाद..
सुनावणीदरम्यान ॲड. माने यांनी न्यायालयाला निदर्शनास आणून दिले की मयत मुलीच्या सुसाईड नोटमध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख नाही. छळाचा ठोस पुरावा नसल्यामुळे आणि केवळ पूर्व वैमनस्यामुळे खोटे आरोप लावले गेले असल्याचे सांगून न्यायालयाने जामीन मंजूर केला.
कोर्टात अशी मांडली बाजू :
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी बाजू मांडली तर सरकारतर्फे ॲड. पी. पी. देवकर यांनी काम पाहिले.
#धनीवालेप्रकरण #सुसाईडनोट #मुंबईउच्चन्यायालय #कोल्हापूरसर्किटबेंच #जामीन #MH13News #मराठीबातम्या #ताजाबातमी #न्यायव्यवस्था #SolapurNews