राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी पदाधिकारी मेळावा
पक्षप्रवेश सोहळाही होणार; महापालिकेची तयारी जोमात
सोलापूर, दि. २० जुलै:
आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संघटन बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने सोमवार, दि. २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले की, या मेळाव्यात इतर पक्षांतील काही प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, हे पक्षबळवाढीसाठी अत्यंत सकारात्मक पाऊल ठरणार आहे.महायुतीच्या माध्यमातून लढणार निवडणूकआगामी महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून सत्तास्थापना करण्याचा आमचा निर्धार असल्याचे पवार व बागवान यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा, हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे, तसेच अनेक विभागांचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:
कार्यक्रमात दिव्यांग सेल अध्यक्ष एम. एम. इटकळे, सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी, सचिव दत्तात्रय बनसोडे, मौला शेख, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी, उत्तर विधानसभा अध्यक्ष मनोज शेरला, तसेच शकील शेख, अनिस शेख, निशांत तारानाईक, हमीद बागवान, मुकेश चौधरी, सरदार फटफटवाले यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. सुनील तटकरे यांचा दौरा म्हणजे पक्षाला नवी ऊर्जाराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी तटकरे यांचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असून, सोलापुरात त्यांच्या आगमनामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि जोम निर्माण झाला आहे.
विविध विभाग, प्रकोष्ठे आणि आघाड्यांमधील कार्यकर्त्यांमध्ये यामुळे मोठा उत्साह संचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले की, हा मेळावा म्हणजे निवडणुकांच्या दृष्टीने शिस्तबद्ध व संघटित तयारीचे एक महत्त्वाचे पाऊल असून, अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षमपणे पुढे जाणार आहे.
⸻🗓️ मेळाव्याची माहिती: •
दिनांक: सोमवार, २१ जुलै २०२५ •
वेळ: दुपारी २ वाजता
स्थळ: हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
• उपस्थिती: खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे