MH 13 NEWS NETWORK
सोलापूर प्रतिनिधी – राज्यात लवकरच होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “भाजपला पदवीधर मतदारसंघ द्यावा आणि शिक्षक मतदारसंघ मंगेश चिवटे यांना द्यावा”, अशी जाहीर मागणी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली.

शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे भरलेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात जिल्हाभरातून तब्बल दोन हजारांहून अधिक शिक्षकांची उपस्थिती होती.
#शहाजी बापूंच्या वक्तव्यामुळे #मंगेश चिवटेंना सुपर पॉवर..!
“सध्याचा शिक्षक आमदार अपक्ष आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळण्यात कोणतीही अडचण नाही. एकनाथ शिंदे साहेबांचे मंगेश चिवटे यांच्यावर विशेष प्रेम असून, त्यांच्या कामगिरीतून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दमदार आमदार म्हणून मंगेश चिवटे ठरतील, असा मला विश्वास आहे.”
कॅशलेस आरोग्य विम्याची मागणी : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे
“मंगेश चिवटे हे राज्यभरात आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात. पुढे ते शिक्षकांच्या मनात स्थान मिळवतील आणि शिक्षकांच्या हितासाठी लढतील, याबाबत आम्ही खात्री बाळगतो.”
तर माजी मंत्री उत्तम प्रकाश #खंदारे यांनी “पुढील वर्षभरात शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले गेले पाहिजेत”, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमातील #मान्यवरांची उपस्थिती
मेळाव्याच्या व्यासपीठावर भाजप महिला अध्यक्ष रोहिणी तडवळकर, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख चव्हाण, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, नगराध्यक्ष वैभव राजे जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
हा #साताऱ्याचा वारसा..!
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भावना
“शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत मी सोलापुरात होतो. मात्र मंगेशच्या प्रेमापोटी पुन्हा रविवारी 400 किमी प्रवास करून या शिक्षकांच्या मेळाव्यात आलो. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देणे हा साताऱ्याचा वारसा असून तो मी जपतो,” असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी देखील “करमाळा तालुक्यातील भूमिपुत्र म्हणून मंगेश चिवटे आमच्या अभिमानाचे कारण आहेत”, असे मत व्यक्त केले.
चर्चा तर होणारच..!
सोलापुरातील या मेळाव्यात मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला मिळालेला शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि वरिष्ठ नेत्यांचा ठाम पाठिंबा पाहता, शिक्षक मतदारसंघातील राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता अधिकच बळकट झाली आहे.