MH 13News Network
सोलापूर शहरातील शिवजयंती मिरवणुकीचे संपूर्ण राज्याला आकर्षण असते.यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2024 ,शिवजयंती मिरवणुकीच्या वेळी माऊली युवा प्रतिष्ठान भजनी मंडळाच्या वतीने पारंपरिक वाद्याचा वापर करून आदर्श मिरवणूक काढली होती. त्याबद्दल पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज 8 एप्रिल रोजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तालयात प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले.
माऊली युवा प्रतिष्ठानचे संस्थापक संजय पारवे तसेच उत्सव अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना प्रशंसापत्र मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यंदाच्या शिवजयंतीवेळी पारंपारिक तसेच अध्यात्मिक मिरवणूक काढून ज्ञानेश्वर माऊली युवा मंडळाने एक आदर्श निर्माण केला होता, अशी चर्चा सर्व शिवजयंती मंडळात झाली होती.
पोलीस आयुक्तांनी ज्ञानेश्वर माऊली युवा मंडळाच्या मिरवणुकीचा गौरव प्रशंसापत्र आणि मानचिन्ह देऊन केला.
भक्ती आणि शक्ती यांचा संगम दाखवण्याचा प्रयत्न..
यंदाच्या मिरवणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंडळाने आदर्शवादी मिरवणूक काढण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे वारकरी संप्रदायातील लहान मुले, मुली ते वयोवृद्ध महिलांपर्यंत भजनी मंडळाच्या माध्यमातून पारंपारिक वाद्याच्या साह्याने मिरवणूक काढण्यात आली होती. पुढील वर्षी सुद्धा अनोख्या पद्धतीने शिवजयंती मिरवणूक काढण्यात येईल. वारकऱ्यांच्या माध्यमातून भक्ती आणि शिवशक्ती यांचा संगम दाखवण्याचा प्रयत्न मंडळांनी केला होता. या उपक्रमाचा सन्मान झाल्यामुळे नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.
संजय पारवे, संस्थापक अध्यक्ष
ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान