मुंबई : बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियमातील कलम 3 (1) नुसार भारतीय इस्लामिक विद्यार्थी चळवळ ‘सिमी’ या संघटनेस बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 अन्वये केंद्र शासनाने 16 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतच्या उलट तपासणीसाठी नवी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषेंद्रकुमार कौरव यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) न्यायाधीकरणाचा दौरा राज्यात होत आहे.
न्यायाधीकरणाने 26 जून 2024 रोजी कोर्ट रूम नंबर 19, पहिला मजला, मुख्य इमारत, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई आणि कोर्ट रूम नंबर एफ, उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे 28 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून दिवसअखेर सुनावणी आयोजित केली आहे. या संदर्भात ज्या इच्छुक व्यक्तींना साक्ष द्यावयाची असेल, त्यांनी त्यांची दुय्यम प्रतितील शपथपत्रे निमस्वाक्षरीत न्यायाधीकरणाकडे दाखल करावीत. तसेच स्वत: 26 जून रोजी उलट तपासणीसाठी न्यायाधीकरणासमोर उपस्थित रहावे, असे आवाहन गृह विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.