Mh 13 News Network
मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता असून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून आरक्षणासाठी येत्या 25 जानेवारीपासून ते पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे महायुती सरकारची डोकेदुखी पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उपोषणाच्या तारखेची घोषणा केली आहे. 25 जानेवारीच्या आत नव्या सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर 25 जानेवारी 2025 पासून पुन्हा एकदा स्थगित केलेले आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
उपोषणाची घोषणा करताना जरांगे पाटील म्हणाले की सरकारने आमच्या मागणी मान्य केल्या नाही. सरकारला हात जोडून विनंती आहे की आरक्षणाच्या आणि इतर मागण्या तातडीने मान्य करा.
25 जानेवारीला महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने अंतरवाली सराटीत उपोषणासाठी यावे असे आवाहनही त्यांनी या पत्रकार परिषदेत केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता सामूहिक उपोषण करणार आहोत मात्र कोणावरही उपोषण करावे असे बंधन नसणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.