mh 13 news network
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. पौर्णिमा हरिजन यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राजकीय वातावरण तापले असून, पारंपरिक पक्षांची गणिते बिघडण्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रचारादरम्यान जनतेशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका आणि सामाजिक न्याय, मूलभूत सुविधा, महिला-सशक्तीकरण व तरुणांसाठी संधी निर्माण करण्यावर दिलेला भर यामुळे मतदारांमध्ये सौ. हरिजन यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. झोपडपट्टी, महिला बचत गट आणि तरुण मतदारांमध्ये विशेषतः मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
“प्रभागातील मूलभूत प्रश्न – पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि स्वच्छता – यावर प्राधान्याने काम केले जाईल,” असा विश्वास सौ. पौर्णिमा हरिजन यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या साध्या, पण ठोस प्रचारपद्धतीमुळे मतदारांमध्ये विश्वास वाढताना दिसत आहे.


या वाढत्या प्रतिसादामुळे इतर राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रभाग क्रमांक ५ मधील निवडणूक चुरशीची होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी दिवसांत प्रचार आणखी वेग घेणार असून, वंचित बहुजन आघाडीचा हा वाढता प्रभाव निवडणूक निकालावर मोठा परिणाम करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.








