MH 13News Network
जीवनातील आनंद, ऐेश्वर्य प्रभू श्रीरामांच्या वैचारीक आचरणाने मिळेल – ह.भ.प.योगीराज महाराज
श्रीवटवृक्ष मंदीरातील श्रीराम नवमी कीर्तन सेवेतून केले निरुपण
वटवृक्ष मंदिरात व ऐतिहासिक श्रीराम मंदिरात पारंपारिक श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न.
(अक्कलकोट, दि.१७/४) -(श्रीशैल गवंडी)
प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थांमध्ये सर्व प्राणी मात्रांना छञछाया देवून त्यांच्यावर अलौकीक कृपा करण्याची साम्यता आहे. श्रीराम हे हिंदू धर्मातील आदर्श दैवत असून जगकल्याणासाठी व धर्म रक्षणासाठी प्रभुरामचंद्रानी आपल्या आयुष्यातील प्रत्येक श्वास अन क्षण खर्च केला. त्या प्रभुरामचंद्राचं स्मरण आपल्यासाठी जीवनातील संकट हरण करणारं आहे. जीवनात प्रभू श्रीरामांच्या विचाराने वाटचाल केली तर आपलं जीवनही मोहमुक्त होईल. प्रभु श्रीरामचंद्रांचे विचार देव, देश, धर्म यांना एकत्रित ठेवतात. आपल्या जीवनात आनंद व ऐश्वर्याची अनुभूती श्रीरामांच्या आचार विचाराने मिळेल असे निरूपण जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोंदीचे रहिवासी ह.भ.प.योगीराज महाराज यांनी केले. ते येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्रीराम नवमी निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेतून निरूपण करताना बोलत होते. येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या स्टेशन रोडवरील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात व श्री वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाने रामनवमी जन्मोत्सव मोठ्या आनंदाने व श्रध्येय भक्तीभावाने साजरा करण्यात आला. श्री वटवृक्ष मंदिराच्या ज्योतीबा मंडपात दिनांक १५ एप्रिल ते दिनांक १७ एप्रिल अखेर ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोंदीकर यांची श्रीराम कथेवर आधारित कीर्तनसेवा संपन्न झाली. आज श्रीरामनवमी रोजी दुपारी १२ वाजता पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या पौरोहित्याने मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते
पाळणा कार्यक्रम व आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कीर्तन सेवेत ह.भ.प.योगीराज महाराज यांना हार्मोनियम वर ओंकार पाठक यांनी तर तबल्यावर नितीन दिवाकर यांनी साथ संगत केली.
तसेच देवस्थानच्या स्टेशन रोडवरील पुरातन कालीन श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीस सकाळी ६ वाजता देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते रुद्राभिषेक पुरोहित मनोहर देगांवकर यांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाला.
तदनंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाची भजनसेवा, पाळणा व आरती संपन्न झाली. तदनंतर देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर श्रीरामनवमी निमित्त श्रीरामांच्या दर्शनाकरिता भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.नागनाथ जेऊरे, शकुंतला साळूंके, कौसल्या जाजू, निर्मला हिंडोळे, निंगूताई हिंडोळे, लक्ष्मी पाटील, सुरेखा तेली, नलिनी ग्रामोपाध्ये, इंदूमती जंगाले, चंद्रकांत डांगे, देवस्थानचे विश्वस्त संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, संतोष पराणे, दीपक जरीपटके, शिवशरण अचलेर, लक्ष्मण पाटील, दीपक पोतदार, अमर पाटील, श्रीकांत मलवे, चंद्रकांत गवंडी, मोहन शिंदे, स्वामीनाथ मुमूडले, महेश मस्कले, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, संजय पवार, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, ऋषिकेश लोणारी, कल्पना पाटील, ज्योती झिपरे, विमल साठे, श्यामला देशमुख, शिलवंती बणजगोळे आदींसह हजारो भाविक भक्त उपस्थित होते.