Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना; उमेदवारांसाठी प्रशिक्षण बैठक

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना; उमेदवारांसाठी प्रशिक्षण बैठक
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर / प्रतिनिधी :

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना करण्यात आली असून, याअनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच उमेदवारांचे अधिकृत खर्च प्रतिनिधी यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी निवडणूक खर्चासंदर्भातील नियम व मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती दिली.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी प्रचारासाठी करण्यात येणारा प्रत्येक खर्च नियमबद्ध, पारदर्शक व वेळेत नोंदवणे बंधनकारक असल्याचे डॉ. जवळगेकर यांनी स्पष्ट केले. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून ते दिनांक १६ जानेवारीपर्यंतचा संपूर्ण खर्चाचा तपशील दररोज खर्च नोंदवहीत नोंदवून निवडणूक खर्च समितीकडे सादर करावा, असे त्यांनी सांगितले.

तसेच दिनांक ८ जानेवारी व १२ जानेवारी रोजी खर्च तपासणी होणार असून, यावेळी उमेदवारांनी प्रचार खर्चाशी संबंधित बँक स्टेटमेंट तसेच सर्व मूळ पावत्या सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिराती, सभा, वाहनांचा वापर, बॅनर, पोस्टर, सोशल मीडियावरील प्रचार यासह सर्व खर्च नियमांनुसार नोंदविणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी निवडणूक खर्च सादर करताना आवश्यक कागदपत्रे, खर्च नोंदवही भरण्याची पद्धत तसेच खर्च निरीक्षकांकडून करण्यात येणाऱ्या तपासणी प्रक्रियेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक खर्च नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.

या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

Previous Post

भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक आणि इशारा

Next Post

प्रभाग ६ मध्ये भाजपाचा झंझावात! होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
प्रभाग ६ मध्ये भाजपाचा झंझावात! होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग ६ मध्ये भाजपाचा झंझावात! होम टू होम प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.