MH13NEWS
पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छतादूतांचा कृतज्ञता मेळाव्यात सन्मान; निर्मल वारीचे उदाहरण
पंढरपूर, दि. २९ जुलै (प्रतिनिधी):
यंदाच्या आषाढी वारीत पंढरपूर आणि सहा जिल्ह्यांमधून सुमारे दोन कोटी भाविकांनी सहभाग घेतला. यात्रेच्या यशस्वी आयोजनामध्ये हजारो कर्मचाऱ्यांचे व स्वच्छतादूतांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या सन्मानार्थ कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

पंढरपूरमधील श्री यश पॅलेस येथे झालेल्या या कार्यक्रमात पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील ग्रामपंचायती, पंचायत अधिकारी, सरपंच, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी, तहसीलदार व विविध यंत्रणांतील कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

🌟 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
आमदार समाधान आवताडेमाजी आमदार प्रशांत परिचारक,जिल्हाधिकारी तथा सिईओ कुलदीप जंगम (सोलापूर)सिईओ गजानन पाटील (पुणे)सिईओ याशनी नागराजन (सातारा)पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके (विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती)—

🧹 स्वच्छतादूतांचा विशेष सन्मान:
पालकमंत्र्यांनी सर्वप्रथम स्वच्छता कर्मचारी जितेंद्र पोरे (वाखरी), गाडगेबाबा वेशातील नागटिळक, भारूडकार चंदाताई तिवाडी, कलाकार दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांचा सन्मान करून उपस्थितांचे मन जिंकले.

कलापथकाच्या सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रम मंत्रमुग्ध झाला.—
🚻 “निर्मल वारी”साठी यंत्रणेचा अभूतपूर्व प्रयत्न:
पालकमंत्री गोरे म्हणाले,

“२५ लाख लोक पंढरीत असले, तरी पालखी मार्गावर दीड कोटीहून अधिक भाविक होते. ११ हजार शौचालये, जर्मन हँगर, पिण्याच्या पाण्याची आणि चहा-नाश्त्याची व्यवस्था यामुळे वारी सुखरूप पार पडली.
व्हीआयपी दर्शन बंद करून ५ तासांमध्ये सामान्य वारकऱ्यांना दर्शन मिळालं. हेच माझं समाधान आहे.”—
📌 प्रशासनाने दिला उत्तम प्रतिसाद:
जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले,
“पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व कामे वेळेत झाली. निधी वेळेवर मिळाला. सर्व यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत राहिल्या.
“माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी “प्रशासनाने मनावर घेतलं, तर अशक्य काहीच नाही” असे सांगत शाबासकी दिली.—
🎙️ सूत्रसंचालन व संयोजन:सूत्रसंचालन – श्वेता हुल्ले
आभार – सचिन जाधव (जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक)
संयोजन – संदीप अटकळे, महेश वैद्य, विकास काळुंखे, कमलेश खाडे, माउली साळुंखे