MH 13 News Network
सोलापूर शहरांमधील प्रसिद्ध अशा एम्प्लॉयमेंट चौक, कामत हॉटेल समोरील चौकामध्ये दुचाकी धारकांसाठी अपघातास आमंत्रण मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सर्कल जवळून वळण घेताना दुचाकी चालकांची घसरगुंडी होत असल्याचे दिसून येत आहे.
आज गुरुवार सकाळी या ठिकाणी असणाऱ्या सर्कल जवळून जाणाऱ्या दुचाकी चालकांना येथून प्रवास करताना तारेवरची नव्हे तर पाण्यावरची कसरत करावी लागत आहे.
त्याचे झाले असे की..
या ठिकाणी सर्कल मध्ये असणाऱ्या फुलझाडींना तसेच दुभाजकांमधील रोपांसाठी पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र रस्त्याची रचना तसेच मध्यभागी सर्कल व्यवस्थित नसल्याने जेव्हा जेव्हा या ठिकाणी पाणी दिले जाते त्यावेळेस किमान पाच ते सहा दुचाकी धारक येथून पडल्याची माहिती परिसरातील दुकानदारांनी एम एच 13 न्यूज सोबत बोलताना दिली.
रस्त्याचा उतार व्यवस्थित केला नसल्याने या ठिकाणी दुचाकी धारक घसरून पडत असल्याचे अनेक वेळा सीसीटीव्ही मध्ये सुद्धा चित्रित झाले असल्याचे येथील दुकानदारांनी बोलताना सांगितले. महापालिकेच्या वतीने या ठिकाणी तातडीने लक्ष देणे गरजेचे असून अपघात झाल्यास या जबाबदार कोण..? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कामत हॉटेल जवळील ट्रॅफिक आयलँड हा बरोबर सेंटरमध्ये असायला हवा. तो तसा नसल्यामुळे वळण घेताना दुचाकी धारकांचा बॅलन्स जाणे हे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे जेव्हा या ठिकाणी पाणी असते तेव्हा वाहनचालक घसरून पडतात. महापालिकेच्या संबंधित खात्याने यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.
योगीन गुर्जर ,सामाजिक कार्यकर्ते, सोलापूर विकास मंच
संबंधित खात्यांच्या प्रमुखांना याबाबत योग्य त्या सूचना दिल्या जातील. त्याचसोबत वाहनधारकांनी सुध्दा काळजी घेणे गरजेचे आहे.
आशिष लोकरे,महापालिका उपायुक्त