महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला करा
कॉलेज कर्मचारी युनियनची मागणी
सोलापूर, दि. १० जुलै-
महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला करावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनने केली आहे.
तसे निवेदन युनियनने सोलापूरचे विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ.उमेश काकडे यांना दिले आहे. यावेळी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, खजिनदार राहुल कराडे, विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे आदी उपस्थित होते.
संबंधित महाविद्यालयातून वेतनाबाबतची माहिती वेळेत न आल्यामुळे यास विलंब होत असल्याचे डॉ. काकडे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे यापुढे जी महाविद्यालये वेतनाबाबतची माहिती वेळेत देणार नाहीत त्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात येईल, असे परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पदोन्नतीचे परिपत्रक काढणार