MH 13News Network
शिंदे फडणवीस सरकारने आता जाग व्हावं, अंतरवाली सराटी मध्ये मराठा आंदोलकांशी चर्चा करणार असल्याचं सांगून प्रत्येकाला आंदोलन शांततेत करावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.
शिंदे फडणवीसांनी शहाण होऊन निर्णय घ्यावा. संचारबंदी शासनाने केली असून प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे मराठ्यांच्या नारळाची लाट उसडू नका असे सांगून त्याच सोबत मराठ्यांचे आंदोलन शांतताच होणार असे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून सांगितले आहे.
अंबडमधून ते परत अंतरवाली सराटी मध्ये आज सोमवारी सकाळी दाखल झाले. धरण आंदोलन जिथे सुरू आहे तिथे शांततेत सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. प्रत्येकाने कायद्याचे पालन केलेच पाहिजे असेही त्यांनी पुढे सांगितले आहे.सागर बंगल्यावर बोलावून फडणवीस यांनी चूक केली आहे. असं सांगून संचारबंदी उठल्यावर मी आलोच असे समजा असा इशारा त्यांनी दिला आहे.
पाच ते सहा हजार पोलिसांचा फौजफाटा हा संचारबंदीमध्ये लावलेला आहे. सगळ्यांनी आपापल्या गावाकडे शांततेने जायचे असे सांगून कायद्यांचा मान ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे खबरदारी घेण्यात आली आहे.