सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार
सोलापूर :महाराष्ट्र शासनाच्या बदल्यांच्या सत्रात सोलापुरात महत्त्वाची नेमणूक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वीणा पवार यांची बदली सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर करण्यात आली आहे.

सध्या या पदावर कार्यरत असलेले रवी पवार यांची पुणे महापालिकेत बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या जागी श्रीमती पवार रुजू होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वीणा पवार यांनी यापूर्वी करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून काम करताना महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यानंतर त्या जिल्हा नगर प्रशासन कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.आज, १५ सप्टेंबर २०२५ रोजी मंत्रालयातून निघालेल्या आदेशानुसार त्यांची सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
सोलापूर महापालिकेच्या कारभारात महिला नेतृत्वाची नवी भर पडली आहे. याआधी आयुक्तपदावर शीतल तेली-उगले आणि आता अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या सर्वोच्च कारभारात महिला नेतृत्वाला नवा अध्याय लाभला आहे.