MH13NEWS network
सोलापूर – प्रभाग क्र. 13 साठी शिवराम प्रतिष्ठानचे सह-संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत वाडेकर यांनी आज भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या सुपूर्द केला.यावेळी मध्य मंडळ अध्यक्ष नागेश सरगम, राहुल सत्यनारायण गंजी, पाटील सर, बाबुराव शिरसागर, श्रीनिवास पोतराज, नागेश म्हेत्रे, विजय अडसुळे, नरेश बंदाराम, दीपक बड्डू, अमर वाडेकर, गणेश दिवसांनी, बाबा वाडेकर, ऋषिकेश कवडदेवी, संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.

वाडेकर यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करताना युवकांचे संघटन, सांस्कृतिक उपक्रम, सार्वजनिक प्रश्नांवर पाठपुरावा आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न केल्यामुळे जनतेत विश्वास निर्माण केला आहे.
शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी ५ हजारांहून अधिक युवकांना विविध उपक्रमांत सक्रिय सहभागी करून घेतले आहे.
“प्रभाग 13 ला आदर्श प्रभाग बनविणार” — वाडेकर..
उमेदवारी अर्ज दाखल करताना वाडेकर यांनी प्रभागातील रस्ते, गटार, पाणीपुरवठा यांसह विकासकामांना गती देण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच प्रभाग 13 ला सोलापूरातील आदर्श प्रभाग बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना अनुमोदन दर्शविले.








