सोलापूर – (प्रतिनिधी)
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजप उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसोबत चारही उमेदवार गेल्याने प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. गडदर्शन सोसायटी, गवळी वस्ती, प्रियदर्शनी अपार्टमेंट तसेच बांधवस्ती परिसरात झालेल्या प्रचारात नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह विविध मूलभूत समस्यांचा पाढा उमेदवारांसमोर मांडला.

महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणार असल्याने प्रभाग क्रमांक ६ मधील पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील, तसेच हा प्रभाग विकासाचे मॉडेल म्हणून शहरात नावारूपाला येईल, असा विश्वास भाजप पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रभाग क्रमांक ६ चे भाजप प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे, माजी नगरसेविका सुनीता कारंडे, महादेव गवळी, बाळासाहेब घुले, वामन वाघचौरे, संदीप काशीद, वैभव जगताप, सुरज काशीद, औदुंबर जगताप, नारायण बचुटे, सुनील कदम, शेखर कवठेकर, बसवेश्वर नवले, किरण वाघमोडे, लखन कारंडे, जयप्रकाश मंठाळकर, संतोष मोरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








