MH13NEWS Network
सोलापूर / प्रतिनिधी
मराठा समाज सेवा मंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज शनिवारी पार पडली. शिवतीर्थ विकास पॅनल आणि संघर्षयोध्दा विकास पॅनल यांच्यात थेट लढत झाली. निकालात शिवतीर्थ विकास पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवला.पराभवाचा धक्का बसूनही संघर्षयोध्दा पॅनलने आपली लढाऊ वृत्ती कायम ठेवत, “आज हरलो, उद्या जिंकूच” असा इशारा दिला आहे.या निवडणुकीची शहरभरात प्रचंड चर्चा झाली.

निकालानंतर दोन्ही पॅनलनी आपापली भूमिका स्पष्ट केली. शिवतीर्थ विकास पॅनलने सर्व मतदारांचे आभार मानले तर संघर्षयोध्दा पॅनलने पराभव पत्करावा लागला तरी लढाऊ भूमिका कायम ठेवणार असल्याचा इशारा दिला.
ॲड. योगेश (दत्ता) पवार यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “पहिल्या प्रयत्नात अपयश आलं तरी आमचा संघर्ष थांबलेला नाही. सत्ताधारी पॅनलने 160 नातेवाईकांच्या जीवावर निवडणूक लढवली, तरी आमच्याकडे ठाम 40 मते आली. हे आमच्यासाठी यशापेक्षा कमी नाही. आजची लढाई हरलो, पण उद्याचं रण आम्हीच जिंकणार.”
संघर्षयोध्दा पॅनलच्या या भूमिकेमुळे निवडणुकीनंतरचा राजकीय रंग अजून गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. निवडणुकीच्या काळात दोन्ही पॅनलने पत्रकार परिषदा घेऊन आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या.