Tuesday, August 26, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापुरात पक्ष्यांसाठी शनिवारी वाटली जाणार १००० जलपात्रे

MH 13 News by MH 13 News
5 months ago
in शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
सोलापुरात पक्ष्यांसाठी शनिवारी वाटली जाणार १००० जलपात्रे
0
SHARES
21
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

लिटिल फ्लॉवर्स स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा असा पाणपोई उपक्रम

सोलापूर : सोलापुरात पक्ष्यांसाठी शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी चार हुतात्मा पुतळा चौक येथे सकाळी आठ वाजल्यापासून पक्षांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासीयांना एक हजार जलपात्र मोफत वाटली जाणार आहेत. सोलापुरातील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या १९८८ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्ष्यांसाठी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. अहमदाबाद मधील अंकुर इंडस्ट्रीज च्या पुढाकाराने सोलापूरकरांना ही पक्षांसाठी मातीची भांडी दिली जाणार असल्याची माहिती जितेंद्र व्होरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जिल्ह्यात महाकाय असे उजनी धरण आहे. या ठिकाणी हजारो पक्षी शेकडो मैल प्रवास करून येतात. सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच होटगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. सोलापूरच्या आजूबाजूचे वातावरण पक्षांसाठी पोषक असल्यामुळे पक्षांचे सोलापूर हे माहेरघर आहे.

लोकांमध्ये पक्षांविषयी प्रेम जागृत व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पाणपोई हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरचे तापमान उन्हाळ्यामध्ये सरासरी ४० अंशाच्या वरच राहते. त्यामुळे पक्षांना पाणी शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आपल्या घराभोवती, गॅलरीमध्ये तसेच बागेत नैसर्गिक चिवचिवाट वाढावा, म्हणून पक्षांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे म्हणून खास अहमदाबाद मध्ये बनवलेली ही मातीची भांडी शहरवासीयांना दिली जाणार आहेत. एकूण ५००० जलपात्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवारी यातील एक

हजार जलपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ सोलापुरातील लोकप्रतिनिधी, तसेच विविध शासकीय अधिकारी आणि उद्योजक यांच्या हस्ते केला जाणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, खासदार प्रणिती शिंदे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निमंत्रण देण्यात आले आहे.

त्यामुळे शहरवासीयांनी शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून चार पुतळ्याजवळ येऊन पक्षांसाठीची ही जलपात्रे घेऊन जावीत. तसेच या भांड्यामध्ये पाणी पिताणाचे पक्षांचे फोटो आम्हाला पाठवावेत त्यातील उत्कृष्ट अशा तीन छायाचित्रांना आम्ही बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करु, अशी माहिती जितेंद्र व्होरा यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस द्वारका उपलप तसेच रमेश रापेल्ली हे उपस्थित होते.

Previous Post

जया ‘भाऊ’..! एक नजर इधर भी..! इथे विकास लंगडतोय..! अजूनही सोलापूरकर आशावादी..

Next Post

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…
सामाजिक

ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…

15 August 2025
Next Post
शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.