Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अमरावती लोकसभा मतदारसंघात १,१६७ मतदार गृहमतदानाचा हक्क बजावरणार ⭕

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
अमरावती लोकसभा मतदारसंघात १,१६७ मतदार गृहमतदानाचा हक्क बजावरणार ⭕
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

मतदानाची गोपनीयता पाळत मतदानाची टक्केवारी वाढवा – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातील 1 हजार 167 नागरिक गृहमतदान करणार आहेत. या मतदारांकडून मतदानाची गोपनीयता पाळत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी प्रशिक्षण कार्यशाळेत आज केले.

85 वर्षांवरील तसेच दिव्यांग मतदारांना गृह मतदान सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मुख्य निवडणूक निरीक्षक सी. जी. रजनीकांथन यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, विभागीय क्रीडा विभागाचे उपसंचालक विजय संतान, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा टपाल मतपत्रिका नोडल अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, निवडणूक आयोगाने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाचा फायदा अमरावती लोकसभा मतदार  मतदारसंघातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना होणार आहे. ही सुलभ प्रक्रिया असली तरी या मतदानाची गुप्तता बाळगणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पथकांनी प्राप्त झालेल्या अर्जानुसार प्रत्येक वयोवृद्ध व दिव्यांगाचे मतदान करुन घ्यावे.

07-अमरावती लोकसभा मतदार संघातील एकूण 1 हजार 167 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली असून यात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 973 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 194 आहे. या मतदारांनी गृहमतदानाकरिता आवश्यक असलेला फॉर्म 12-डी प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जानुसार गृहमतदानाची प्रक्रिया शुक्रवार, दि. 12 ते 14 एप्रिल दरम्यान होणार आहे. वयोवृद्ध व दिव्यांगाच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधासभानिहाय पथक तयार करण्यात आले असून या पथकामध्ये मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलीस व व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे.

Previous Post

मुख्य निरीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक विषयक विविध विभागांचा आढावा ⭕

Next Post

धर्म व समुदायाच्या नावावर गैरसमज पसरवणाऱ्या ५ जणांवर नांदेडमध्ये गुन्हे दाखल ⭕

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
धर्म व समुदायाच्या नावावर गैरसमज पसरवणाऱ्या ५ जणांवर नांदेडमध्ये गुन्हे दाखल  ⭕

धर्म व समुदायाच्या नावावर गैरसमज पसरवणाऱ्या ५ जणांवर नांदेडमध्ये गुन्हे दाखल ⭕

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.