Saturday, February 14, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कोल्हापूर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी एमआयडीसीकडील १२ हस्तांतरित

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र
0
कोल्हापूर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी एमआयडीसीकडील १२ हस्तांतरित
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील विकासवाडी गावाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या ४२१ हेक्टर जागेपैकी १२ हेक्टर जागा क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या जागेवर स्टेडिअम उभारण्यासाठी लागणारा खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार असून क्रीडा विभागाने त्यांच्याशी करार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला क्रीडांगण उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार तथा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे शहरी भागासह ग्रामीण परिसरात देखील क्रीडा क्षेत्राला वलय प्राप्त होऊ लागले आहे. राज्यासह देश पातळीवर क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस क्रिकेट खेळाची लोकप्रियता वाढू लागली आहे. क्रिकेट खेळाडूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुढील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात क्रिकेट खेळाच्या विकासासाठी आणि सर्वोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी दर्जेदार क्रीडांगणांची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम झाल्यास कोल्हापूरसह सांगली, सातारा परिसरातील क्रिकेट खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. यासाठी विकासवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेली १२ हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी क्रीडा विभाग आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाने विकासवाडी येथे त्यांच्या ताब्यात असलेल्या १२ हेक्टर जागेसंदर्भातील डी-नोटिफिकेशन त्वरित काढावे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी या जागेबाबतचा अहवाल तातडीने संबंधित विभागांकडे पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली.

Previous Post

रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्ट

Next Post

ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन‍ विकासाला मिळेल चालना

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन‍ विकासाला मिळेल चालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.