Thursday, August 27, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

९८ वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या पहिल्या गृह मतदार

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
९८ वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या पहिल्या गृह मतदार
0
SHARES
25
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

भंडारा : चुनाव का पर्व, देश का गर्व, ह्या घोषवाक्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा- गोंदिया मतदारसंघासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने  प्रथम गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. यामध्ये 85 वर्षांहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी 12 डी नमुना भरून दिला, त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात आली.

मूळ साकोली येथे रहिवासी असणाऱ्या जैनबी जब्बार कुरेशी ह्या 98 वर्षाच्या असून आजारामुळे त्या अंथरुणाला खिळून आहेत. अनेक वर्ष झाले त्यांनी मतदानामध्ये सक्रिय मतदान केले नव्हते. कारण मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्यांना आधार घेत जावे लागत होते. त्यामुळे अमूल्य मताधिकारापासून त्या वंचित राहत होत्या, मात्र आयोगाने गृह मतदान सुविधा उपलब्ध करून दिल्याने या लोकसभा निवडणुकीसाठी जैनबी जब्बार कुरेशी यांनी मतदान केले.

दोन मुलं आणि दोन मुली असलेल्या जैनबी यांच्या कुटुंबांमध्ये त्यांचे पुत्र कलीम जब्बार कुरेशी यांनी गृह मतदान प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच मतदान प्रक्रिया  गोपनीयतेने पार पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये गृह मतदानाची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पहिल्या दोन दिवसात 1243 मतदारांनी मताधिकार बजावला.

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ 7 एप्रिल रोजी करण्यात आला. जैनबी यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले.

मतदानाची गोपनीयता :

 गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सूचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये जैनबी यांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्या जवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफ्यामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

Tags: Loksabha election
Previous Post

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक  

Next Post

लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या ⭕

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या ⭕

लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या ⭕

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.